१९८ शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात आमदार अशोक पवार व माजी आमदार ग्रामीणमध्ये दिलेल्या उमेदवारांमध्ये अनुक्रमे

१९८ शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबुराव पाचर्ण यांच्यानंतर हजारो मतदारांनी चंदन सोंडेकर यांच्यावर दाखविला विश्वास नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक २०१९ पार पडली . यामध्ये आपण १९८ शिरूर- हवेली , पुणे महाराष्ट्र या मतदार संघातून मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली . वंचितामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जागा झालेला आत्मविश्वासाच्या आधारावर विधानसभेची निवडणूक आपण स्वबळावर लढविली. प्रशासनाने संवेदनशील म्हणून घोषित केलेल्या व मागील वर्षी शिरूर मतदार संघातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वढू बद्रक व विजयस्तंभ भीमा कोरेगाव येथे दोन समाजामध्ये समाजकंटकांनी तेढ निर्माण केली व दंगली घडवून आणल्या . त्या पार्श्वभूमीवर आपण माझ्या सारख्या मराठा समाजातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी देउन संपूर्ण राज्यामध्ये एकात्मतेचा संदेश दिला . व संबधित मतदान केंद्रावर शांततामय वातावरणात निवडणूक पार पडली हा आपल्या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्ह्यातील विजय आहे. ग्रामीणमध्ये दिलेल्या उमेदवारांमध्ये अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव , खेड- आळंदि , पुरंदर , दौंड , इंदापूर आणि बारामतीमधील उमेदवारापेक्षा शिरूर हवेलीमध्ये जास्तीचे मताधिक्य मिळाले. यामुळे शिरूरमध्ये नवनेर्तृत्वास लोकमान्यता मिळाली. शिरूरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अनेक राष्ट्रीय राज्यस्तरीय पक्षाचे एकूण दहा उमेदवार असताना शिरूरमधील जनतेने एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारी भाजपची सत्ता व जिल्हा परिषद, पंचायत समिती , साखर कारखाने अशा सहकारी संस्था ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नंतर माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्या क्रमांकाची हजारो मतदान देऊन सामाजिक व राजकीय कार्य पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन व आशीर्वाद दिलेला आहे .नवनिर्वाचित आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबुराव पाचर्ण यांच्यानंतर हजारो मतदारांनी चंदन सोंडेकर यांच्यावर विश्वास दाखविला. उपेक्षित , वंचित समाजघटकाचा उद्धार करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरा व वारसा आपण समर्थपणाने पुढे नेणार आहोत , आपण भविष्यकाळात जनतेची कामे जोमाने करणार आहोत , असे चंदन किसनराव सोंडेकर यांनी सांगितले.